वनस्पतींसाठी किती सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत?
नमस्कार मित्रांनो आज आपन पीकांन मधल्या मायक्रो न्यूट्रीयन्स बद्दल म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्ये बद्दल पाहणार आहोत. मित्रांनो पिकांनमधी जर पाहिलेतर 16 सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. कोनकोनती मायक्रो न्यूट्रीयन्स आवश्यक असतात, त्याची कमतरत आपन कशी ओळखू शकतो, त्यासाठी आपल्याला काय करणे आवश्यक आहे आणि त्या मायक्रो न्यूट्रीयन्स चे आपल्या पीका मध्ये काय कार्य आहे ही सर्व माहीती या लेखामध्ये पाहणार आहोत व वनस्पतींसाठी किती सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत? हेही आज आपन या लेखात पाहणार आहोत. हा लेख वाचून तुमचा उत्पादन खर्च देखील कमी होणार आहे.

मित्रांनो पीकांनमध्ये मायक्रो न्यूदीयन नाही तर दूसरी सोळ वेगवेगळी अन्नद्रव्ये गरजेची असतात त्यामध्ये तेरा पीकाला जमीनीच्या माध्यमातून मीळतात तर उरलेली तीन हव आणि पाण्या मधून मीळतात. जमीनीमधली अन्नद्रव्ये जर आपन पाहली तर त्यामध्ये नत्र, स्फूरत व पलाश हि सर्वात जास्त प्रमानात आपल्या पीकाला लागतात आणि यामध्ये दुह्यम अन्नद्रव्ये आहेत ती कमी प्रमाणात लागतात त्यांची नावे कॅलसीयम, मॅगनेशीएम आणि सलफर आणि जी खूप सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात पन त्यांचे कार्य ही तितकेच महत्वाचे आहे त्यांची नावे Iron, zinc, Mangnese, Molybdenum, copper आणि Boron आता हि सर्व झाली जमीनीतून मीळनारी 13 सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि राहिलेली तीन मीळतात हवेतून आणि पाण्यातून त्यांची नावे carbon, Hydrogen आणि oxygen मीत्रांनो हि सर्व अनद्रव्ये महत्वाची आहेत जरी हि सूक्ष्म असली तरी त्यांचे कार्य तेवढेच महत्वाचे आहे.
लोहा :-
लोहाचे कार्य: पीकांच्या हरीद नीर्मीती साठी लोहा चे कार्य खूप मोठे असते प्रकाश संश्लेशन तसेच श्वशन क्रिये मध्ये सुद्धा लोहाचा खूप मोठा वाटा असतो.
लोहयाची कमतरता कशी ओळखायची ?: पिकाच्या शेंड्याकडील जे पाने असतात त्यांनच्या शीरांनमधील भाग पिवळा पडलेला दिसतो आणि तुमच्या झाडाची वाढ पन कमी होते झालेली दिसते.
मँगनिज :-
मँगनीजचे कार्य: प्रकाश संश्लेशन, प्रथीने ना तसेच संजीवक प्रक्रीये मध्ये मँगनीजचा खूप मोलाचा वाटा असतो पिकांनमधल्या वेगवेगळ्या रासायनीक प्रक्रीयेमध्ये एक संप्रेरक म्हणून एक मँगनीज कार्य करते तसेच हरीत द्रव्य नीमीती मध्ये सुद्धा मँगनीज कामी येते. मँगनीजची कमतरता कशी ओळखायची? : पीकाचे जे पान आहे त्याच्या शीरा फक्त हिरव्या असतात राहतात दोन शिरान मधला भाग हळूहळू तुम्हाला पीवळ पडलेला दिसून येतो.
तांबे (copper) :-
तांब्याचे कार्य : तांब्याचा देखील प्रकाश संश्लेशना मध्ये खूप मोठा वाटा असतो फळ आणि फळाचा रंग, फळाची चव यामध्ये देखील Copper चा खूप मोठा वाटा असतो.
तांब्याची कमतरता लक्षण: झाडाच्या शेंड्याचा भाग खुटलेला दिसतो व तांब्याची कमतरता असल्यास पीकाला डायबॅग नावाचा रोग होऊ शकतो आणि झाडाची वाढ कमी होते, झाडाची पानगळ होते.
जस्त (zinc) :-
जस्ताचे कार्य : झाडाच्या शेंड्याची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी जस्ताचे कार्य खूप महत्वाचे असते. जर तुमच्या पीकामध्ये जस्ताचे प्रमाण वाढले तर कमी, जास्त तापमानामध्ये सुद्धा तुमचे पीक चांगले तगदक होऊ शकत.
जस्ताची कमतरता लक्षणे: जस्ताचे प्रमाण कमी झाल्यावर झाडाची पाने लहान होऊन शिरांन मधला भाग आपल्याला पितळ पडलेला दिसतो.
बोरॉन :-
बोरॉन चे कार्य : फूल निर्मीती, परागी भवन, फळ निर्मीती, फळांची संख्या वाडने, बीज नीर्मीती इ. प्रमुख बोरॉन ची कार्ये अहेत.
बोरॉन कमतरता लक्षण: फळांची व फुलांची गळती झालेली दिसेल आणि फळे तडकलेली दिसतील.
माॅलीप डीनम :-
माॅलीप डीनम चे कार्य: नत्रस्तीरी करन करणाऱ्या जीवानूंची संख्या वाढवने हे याचे प्रमुख कार्य आहे. पॉ
माॅलीप डीनम कमतरता लक्षणे: पाने पीवळी पडून त्यावर तपकेरी कलरचे टिपके दिसतात व पान मागच्या - बाजूने देखील तपकेरी झालेली दिसून येते.
सूक्ष्म पोषक खत म्हणजे काय? :-
सूक्ष्म अन्नद्रव्ये ही अशी खते आहेत जी पीकाला कमी प्रमाणात लागतात पन त्यांचे कार्य पिकाच्या वाढीसाठी व पिकाच्या विकासासाठी तितकेच महत्वाचे आहे. जसे फुलने, फळ येने इ.