नापीक जमीन सुपीक कशी करायची
शेतकरी मीत्रांनो आज या लेखामध्ये आपन पाहणार आहोत नापीक जमिन सुपिक काशी बनवायची. तर मीत्रांनो यासाठी थोडीसी मोठी प्रक्रीया राहणार आहे व तुम्हाला पुढील चार ते पाच वर्षात तुमच्या पीकामध्ये, तुमच्याजमीनी मध्ये तुमच्या पीक व्यवस्थापना मध्ये चांगल्या प्रकारचे बदल करावे लागतील तरच ते शक्य होनार आहे.
यांमध्ये आता तुम्ही म्हणाल एखादे खत तुम्ही आज आनले आनी काही दीवसात तुमची जमीन सुपीक होईल तर असे नाही होनार त्यासाठी तुम्हाला जास्त कालावधी लागनार आहे किमान चार ते पाच वर्षांचा या चार ते पाच वर्षात तुमची जमीन पीकासठि योग्य प्रकारे तयार होईल मग या मध्ये तुम्ही कोणतेही पीक चांगल्या प्रकारे घेऊ शकता.
सुपिक जमिन नापीक होण्यामागचे कारण :
वीस ते पंचवीस वर्षा मागचा जर तुम्ही कालावधी पाहीला तर तेव्हा शेता मध्ये आपन फक्त दोन ते तीन बैलगाडी शेनखत टाकत होतो त्यामध्ये, सुद्ध! आपली जमीन सुपीक होती, तुम्हाला खुप चांगल उत्पादन देत होती. कीटकांचा प्रादुरभाव ही कमी होता. पन आता जर चार ते पाच वर्षाचा कालावधी पाहीला तर यामध्ये आपन आता वेगवेगळे रासायनीक खत टाकतो आहोत, वेगवेगलळे महागडे खत टाकत आहे, वेगवगळळे महागडे किटकनाशकांचा वापर करत आहे तरीही आपल्याला किड-रोग नियंत्रात येत नाही, उत्पादन चांगले निघत नाही आणि वर्षो न वर्ष आपली जमीन नापीक होत आहे.
कारणे :-
- एकाच पीकाचे उत्पादन आपन वर्षो न वर्षों त्या जमीनीत घेत आहे.
- तुम्ही जमीनीचे माती परीक्षण करत नाही आणि रासायनिय खताचा भरेपूर वापर करत आहात.
- पाण्याचे व्यावसस्थापन करत नाही.
- जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा कमी वापर व वेगवेगळ्या बुरशी नाशकांचा महागड्या कीटक नाशकांचा वापर अति करने.
- शेतीला आवश्यक रेस्टींग पिरेड तुम्ही देत नाही.
नापीक जमीन सुपीक कशी बनवायची? :
पहिल्यांदा आपल्याला पीक कोणत्या हंगामात घ्यायचे आहे, तो हंगाम निश्चित करायचा आहे. पेरनीची योग्य तारीक निश्चित करायाचि आहे आणि आपल्या वातावरणात जे पीक चांगले येते त्याच पिकाची नीवड करायची आहे. वर्षातून कमीत कमी 2 ते 3 महीने शेताल आराम द्यायचा आहे कारण आपन एखादया जमीनीतून 70 टन ते 80 टन पर्यत इतका उस काढतो यामुळे त्या जर्मनीची ताकद आपन काडुन घेतो पन तेवढे आपन परत जमीनीला देत नाही त्यामुळे जमीनीला आराम देणे गरजेचे आहे आराम दिल्यानंतरच पुढचे पिक घ्यायचे आहे. तुमचे प्रमुख पिक ऊस निघाल्यावर पिक बदल करा जसे त्याठीकाणी उडीद, मूग, चवळी तर, सोयाबीन, वटाना, गवार, मेथी, भुईमुग, हरभरा घेवडा ई. अशी पीके त्याठीकाणी पीक बदल म्हणून तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला शेतामध्ये सेंद्रीय खतांचा भरगोस वापर करायचा अहे. जसे शेणखत, कोबडीखत, गांडूळखत, सी.टी कंपोस्ट या खतांचा तुम्हाला जास्त वापर करायचा आहे म्हणजे 60 टक्के रासायनिक आणि 40 टक्के सेंद्रीय खत टाकायचे आहे, कारण आत्ता लगेच सर्व सेंद्रीय खत बंद करणे शक्य नाही होणार त्याचबरोबर जमीनीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जीवानूंचा वापर करायचा आहे जसे नत्र, स्फुरद आणि पलाश यांनसारख्या जिवाणू खतांचा वापर करायचा आहे आणि हे जिवानू आपल्याला टप्याटप्यानी दिपद्वारे समान जमिनमध्ये सोडायचे आहे. तर मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही तुमची नापीक यी सुपीक बनवू शकता यासाठी तुम्हाला चार ते पाच वर्षांचा कालावधी लागेल या कालावधी मध्ये तुमची जमीन योग्य प्रकारे सुपीक होईल.
नापीक जमीन म्हणजे काय? :
नापीक जमीन म्हणजे खडकाळ, बारीक मातीची किंवा व्हाळू असलेली जमीन नापीक असते. त्याठिकानी कोणतेही पीक योग्य प्रकारे येत नाही. म्हणजे एक त्रीतीअंश इतकेच वनस्पती असतात त्यामध्ये कोणते ही पीक चांगल्या प्रकारे येत नाही, अश्या जमीनीलाच आपन नापीक जमीन असे ही म्हणतो.
सूपीक जमीन म्हणजे काय ? :
सूपीक जमीन म्हणजे, अशी जागा जमीन त्याठीकाणी एखादे वनस्पती म्हणजेच पीक चांगल्या प्रकारे येते आणि त्या जमीनी मध्ये वनस्पतीस आवश्यक सर्व घटक असते जसे नत्र, स्पूरत सारखे वनस्पतीस आवश्यक घटक त्या जमीनी मध्ये योग्य प्रमानातअसते. त्यामुळेच त्या जमीनीला सुपीक जमीन म्हणतात.


