खरीप हंगामाची पूर्वतयारी कशी करावी I पहा सविस्तर

खरीप हंगाम पूर्व तयारी

शेतकरी मीत्रांनो जवळ-जवळ उन्हाळा आता संपत आलेला आहे आणि काहि दिवसान मध्ये खरिप हंगामाला सुरुवात होनार आहे. खरिप हंगाम म्हणल की जवळ जवळ सर्व शेतकच्यांची खरीप पेरणी साठी लगबग सुरू होते. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत खरीप हंगाम पूर्व तयारी कशी करावी.


नेरुत्य मानसून वाऱ्या पासून आपल्या भारतामध्ये पाऊस पडतो या वर्षी हवामान खात्याने चांगल्या प्रकारचा पाऊस म्हणजे सरासरी 67% किंवा 67% पेक्षा जास्त पावसाचा अंदाज दर्शिवला आहे.आणि त्याच बरोबर या बर्षीचा मानसून शेतकच्यांनसाठी चांगला दार्शीवीला आहे. हा माणसून पोषक असणार आहे. असे देखिल सांगितले आहे. तर मित्रांनो ही झाली मानसून ची चर्चा परंतु नुसती माणसूनची चर्चा करून चालणार नाही. आपल्या खरीप हंगामाची पूर्व तयारी हा लेख वाचून तितक्याच जोमान करायची आहे.


खरीप हंगाम म्हणजे काय ? :

 खरीप हंगामा मध्ये भात, भुईमुग, मूग, बाजरी, ज्वारी, मका , तूर, कापूस, सोयाबीन इत्यादी पिकांचा समावेश होतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी होणाऱ्या या पिकांना खरीप पिके असे म्हटले जाते याताच आपन खरीप हंगाम असे ही म्हणतो मात्र, पावसाळा हा किमान 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहतो. खरीप हंगाम हा जून ते सप्टेंबर या माहिन्यांमध्ये असतो.


खरिप हंगामची पूर्व तयारी:

तर सर्वात आधि आपल्याला हा जो तुमच्या कडे रेस्ट पिरेड आहे. या काळा मध्ये सर्वात आगोदर तुमची जमीन जर खाली असेल तर त्या जमीनीचे माती परिक्षण करून घ्या कारण एकदा की पाऊस चालू झाला की जमिन ओली होते अथवा ओली राहते त्यामुळे मातीचा नमुना घेणे अवघड होते त्यामुळे आत्ताच माती परीक्षण करा माती परिक्षण केल्यावर तुम्हाला कळेल या वर्षीच्या खरीप हंगामात जे आपण पिक घेणार आहोत त्या पिकासाठी एकून किती खते टाकने आवश्यक आहे आपल्या जमिनी मध्ये किती आहे हे आपल्याला कळणार आहे यामुळेे तुमचा खर्च देखील कमी होणार आहे आणि पिकाचं उत्पादन देखील वाढनार आहे.


जामिनीची पूर्व मशागत :

जमिनीच्या पूर्व मशागतीमध्ये तुम्हाला शेतीची खोल नांगरट करून घ्यायची आहे जीतकी शक्य होईल तिथकी खोल नांगरट करायची आहे ढेकळ वर एउ दया यामुळे मागील हंगामामधील मागिल वर्षी जे काही वेगवेगळे किटक आणि रोगांच्या वेगवेगळ्या आवस्था सुक्त आवस्तांमध्ये साहिलेल्या असतात. त्या कडक उनाच्या संपर्कात आल्यावर नष्ट होतात, विविध पक्षांच्या माध्यमातून खाल्या जातात आणि त्या बऱ्याच अंक्षी नष्ट होतात. यानंत आपल्या शेतामध्ये जे काही शेणखत टाकायचा आहे तो शेनखत देखील आपल्याला खालच्या थरा पर्यंत सहजपने मिसळता येऊ शकतो.......त्याच बरोबर शेनखता सोबत कंपोस्ट बॅक्टेरीया जे कुजवणारे जिवानू असतात ते आपल्याला जमिनित टाकायचे आहे मग आपली जमीन तुम्हाला शेती पेरणी योग्य करणे गरजेचे अहे. ज्या भागांनमध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती ज्या भागामध्ये नेहमी म्हणजेच जर पावसाळ्यामध्ये बांध फुटी होत असते त्या ठीकाणचे बांध बंधीष्ठी करायची आहे ज्यामुळे जास्त पाऊस झाला तरी त्या ठीकाणची जास्त माती वाहून जाणार नाही आणि आपली जी माती आहे ती शेतामध्येच राहणार आहे. दगडाचा खळगा देखील तुम्ही त्या का ठीकाणी तयार करू शकता बऱ्याच ठिकाणी बांधावर वेगवेगळी झाडे झुडपे ( बाबळी ) असतात जी झाडे अनुपयोगी आहेत ती तुम्हाला आत्ताच काढून टाकायची आहेत (लिंबाची, वडाची, पीपळाची व फळांची वगळून). त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या खरीप हंगामामध्ये आपल्या जमिनी नुसार माती परिक्षण केल्या नंतर तुम्हाला समजून जाइल की आपल्या जमीनीत कोणते पीक येते त्या पीका नुसार आपल्याला त्या पीकाचे बीयाने, बीज प्रक्रीया करण्यासाठी चे लागणारे औषध आत्ताच खरेदी करून ठेवल तर खूप चांगल होणार आहे कारण ऐन वेळी काय होते ज्या जातीची बीयान आपल्याला खरेदी करायचे आहेत ते मिळत नाहीत मग विनाकारन दुसऱ्या जातिचे बियाने घ्यावे लागते त्यामुळे आधिच जर सर्व वस्तु घेतल्या तर त्या सहज बाजारात भेटतात त्या बाजारात उपलब्ध असतात.
        बरेच शेतकरी फळ बागांची लागवड करतात. मग तुम्ही आत्ता काय करू शकता जो तुमचा रेस्ट पिरेड आहे. या काळामध्ये तुमच्या शेताची आखनी करू शकता, त्याठीकाणी तुमच्या गरजे नुसार आकाराणी खड्डे पाडून घेऊ शकता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ऊन जाऊ दया मग त्या ठीकाणची बुरशी वाडनार नाही ते खड्डे एकदा पाण्याने भरून घ्या पाणी मुरल्यानंतर त्यामध्ये पाला पाचोळ भरून घ्यायचा आहे. त्यानंतर एक-दोन पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये तुम्ही लागवड करू शकता. हा सर्वात चांगला कालावधी असतो या काळात तुम्ही तुमचा डीपी तपासून शकता, तुमच्याकडे मोटर असेल तर तीही तुम्ही या काळात तपासून घेउ शकता आणि जर तुमच्या कडे ड्रीप असेल तर ती तुम्ही अॅसेड च्या सहायाने स्वच्छ करून घ्यायची आहे. जसे शेणखत, कोबडीखत, गांडूळखत, सी.टी कंपोस्ट या खतांचा तुम्हाला जास्त वापर करायचा आहे म्हणजे 60 टक्के रासायनिक आणि 40 टक्के सेंद्रीय खत टाकायचे आहे, कारण आत्ता लगेच सर्व सेंद्रीय खत बंद करणे शक्य नाही होणार त्याचबरोबर जमीनीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जीवानूंचा वापर करायचा आहे जसे नत्र, स्फुरद आणि पालाश यांनसारख्या जिवाणू खतांचा वापर करायचा आहे आणि हे जिवानू आपल्याला टप्याटप्यानी ड्रिपद्वारे समान जमिनमध्ये सोडायचे आहे.


खरीप हंगामात कोणती पिके घेतली जातात? :

खरीप हंगामामध्ये अनेक पीके घेतली जातात त्यामध्ये ज्वारी, मका, चहा, रबर, कॉफी, तांदूळ, तीळ, तृणधान्ये जसे की अरहर डाळ, कापूस, तेलबिया, मोती बाजरी, सोयाबीन, तांदूळ, गवार .इ अशी अनेक पीके खरीप हंगामामध्ये घेतली जातात.


माती परिक्षण कशे करायचे ? :






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने