झेंडू चे उत्पादन कसे वाढवायचे ? | आता झेडू चे उत्पादन 100% वाढनार

मित्रांनो आज आपन या लेखा मध्ये पाहणार आहोत झेंडूचे उत्पादन कसे वाढवायचे ? तर मित्रांनो हा लेख वाचून 100% तुमचे झेंडूचे उत्पादन वाढनार आहे आणि या लेखामध्ये आपण पीक लागवडी पासून पीक नेघेपर्यंतची सर्व माहीती पाहणार आहोत. मित्रोंनो झेंडूचे पीक पुने, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, परभणी, औरंगाबाद, नांदेड आकोला, नागपूर इ. या सर्व जिल्ह्यांन मध्ये सर्वात जास्त प्रमाणात झेंडू चे उत्पादन घेतले जाते.

तर मित्रांनो झेंडू चे उत्पादन वाढवण्यासाठी सर्वप्रथम त्यासाठी मित्रांनो तुमची जमीण कसदार, उपजाऊ असली पाहिजे, जर मित्रांनो तुमची जमीन नापीक असेल तर ती सुपीक कशी बनवायची हे पाहण्यासठी इथे क्लिक करा. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जमीनीतील सेंद्रीय कार्बन चे प्रमाण 0.5 ते 0.7 इतके असने गरजेचे आहे व मित्रांनो जमीनीचा सामू हा 6 ते 7.5 दम्याण असणे आवश्यक आहे आणि मित्रांनो जमिण ही पाणी धरून ठेवणारी परंतु पाण्याचा चांगला निचरा करणारी असावी. तर मित्रांनो झेंडू हे पीक उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात चांगल्या प्रकारे येते आणि मित्रानो त्यासाठी आश्यक तापमान रात्रीचे 15 ते 18  डिग्री सेलसीएस, या तापमानात झेंडू या पीकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. तर मित्रांनो शेताच्या पूर्व मशागती मध्ये तुम्हाला पहिल्यांदा एक खोल नांगरट करून घ्यायची आहे आणी नागरटी नंतर एक ते दोन कुळपाच्या पाळ्या टाकून घ्यायच्या आहेत, रोटर ने तुमचे रान एकदा भूसभूशीत करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो तीथे तुम्हाला गांधी वापा तयार करून घ्यायचा आहे त्याची उंची 30 सेंटीमीटर व रूंदी ही 60 सेंटीमीटर इतकी ठेवायची आहे आणि दोन बेड मधील अंतर तुम्हाला 40 ते 45 सेंटीमीटर इतके ठेवायचे आहे आणि जर मित्रांनो तुमच्याकडे शेणखत असेल तर तुम्ही तो शेणखत शेतामध्ये टाकून घ्यायचा आहे यामुळे तुमच्या जीमीनीला जो रासायनिक खातांचा खर्च होणार आहे तो खर्च कमी प्रमाणत होइल व तुमच्या पीकाचे उत्पादन ही वाढेल. तर मित्रांनो या तयार केलेल्या गांधी वाप्यावर तुम्हाला झेंडू ची रोपे ही 45 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लावून घ्यायची आहेत. तर आता मित्रांनो पीकाच्या वाढीसाठी आवश्यक म्हणजे भेसळ डोस, भेसळ डोसामध्ये तुम्हाला युरिया 40 किलो, डी.ए.पी 50 किलो आणी 50 किलो पोट्याश अजून त्यामध्ये मायक्रो न्यूट्रीयंटस 10 किलो दानेदार स्वरूपात व सलफर 4 किलो हे सर्व खत एकत्रीत करून बेड मध्ये भरून घ्यायचे आहे. तर मित्रांनो या रासायनिक खातांन मध्ये जर तुम्हाला भेसळ वाटली तर ती घरच्या घरी कशी ओळखायची हे पहण्यासाठि इथे क्लिक करा. तर मित्रांना पीकाची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी आवश्यक असते ते पाणी, पण्याची कमतरता होऊ नये यासाठी आवश्यक असते पाण्याचे व्यवस्थापन ते कशे करायचे जर मित्रांनों तुम्ही खीरीप हंगामामध्ये झेंडू लावला असेल तर तुम्हाला 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यायचे आहे, जर तुम्ही रबी हंगामामध्ये झेंडू लावला असेल तर तुम्हाला 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यायचे आहे आणि जर तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये झेंडू लावला असेल तर तुम्हाला 5 ते 7 दिवसांच्या अंतराने पाणी द्यायचे आहे आणि मित्रांनो जेव्हा आपले झेंडूचे फुल तोडण्याच्या आवस्थेमध्ये येते तेव्हा तुम्हाला पाण्याचा तान पडून द्यायचा नाही. तर आता  मित्रांनो पिकाच्या अंतर माशागति मध्ये तुम्हाचा झेंडू लावल्यानंतर दोन आठवड्यांनी खूरपनी करायची आहे आणि आता मित्रांनो फुले कशी तोडायची फुलेतोडतानी आपल्याला फुलाच्या डेटाचा दौंड तोडायचा आहे आणि झेंडू ची फुले तोडल्यानंतर तुम्हाला एका ठंड ठिकाणी ठेवायची आहेत आणि मित्रांनो झेंडूच्या फुलांची तोडणी शक्यतो तोम्हाला संध्याकाळच्या वेळी करायची आहे, कडक उन्हात करायची नाही.

तर मित्रांनो ही झाली झेंडू लागवडी पासून झेडू निधेपर्यत ची सर्व माहिती तुम्ही जर या पद्धतीने तुमच्या झेंडूच्या पीकाचे नियोजन केले तर 100% तुमच्या पीकाचे उत्पादन वाढनार आहे.


झेंडूचा शेंडा खुड़ने आवश्यक आहे का ?:

जर मित्रांनो तुमच्या पीकात नत्राचे प्रमाण जास्त झाले असेल, पीकाची वाढ जर खूप होत असेल तर मित्रांनो पिकाचा शेंडा खुड़ने गरजेचे आहे यामुळे पीकाला जास्त फांद्या फुटतात व पिकाचे उत्पादन वाढते.


झेंडू किती दिवसात येतात?:

झेंडूचा पाहिला तोडा होण्यासाठी 123 ते 136 दिवस लागतात.



अजून पहा : नापीक जमीन सुपीक कशी बनवायची?  ट्रेक्टर खरेदीव किती अनुदान भेवनार ?  रासायनीक खातांमधील भेसळ कशी ओळखायची ? पहा .संपूर्ण माहिती  खरीप हंगामाची पूर्वतयारी कशी करावी I पहा सविस्तर  वनस्पतींसाठी किती सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत प्लास्टिक मल्चिंग पेपरवर 50% भेटनार अनुदान ?

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने