मीत्रांनो आज आपन या लेखा मध्ये पाहणार आहेत सोयाबिनचे चांगले उत्पादन कसे घ्यायचे ? व लागवडीसाठ योग्य हंगाम कोणता?, लागवडी पूर्वी जमीनीची मशागत, लागवडी साठी योग्य बियानांची नीवड कशी करायची ही सर्व माहिती आज आपन या लेखामध्ये पाहणार आहोत आणी मीत्रांनो हा लेख वाचून तुम्ही १०० टक्के तुमच्या सोयाबिन पिकाचे चांगले उत्पादन घेऊ शकता.
तर मत्रांनो सर्वप्रथम आपन पाहनार आहोत सोयाबिन लागवडीसाठी कोणत्या जातीची नीवड करायची, तर मित्रांनो पीकेव्ही येल्लो गोल्ड (ए एम एस - १००१), एमयूएस - १६२, एमयूएस - ६१२, फुले संगम ( केडीएस - ७२६ ), फुले अग्रणी (केडीएस - ३४४), जेएस ३३५, जेरस ९३०५ अश्या सोयाबीनजातींची नीवड तुम्ही करू शकता.
बीजप्रक्रीया कशी करायची ? :-
तर मित्रांनो बीजप्रक्रीयेमुळे जे जमिनीमधून बियानांना कीटकांचे प्रादुर्भाव होतात त्याचे प्रमान कामी होते आणि मित्रांनो या सोयाबिन पीकामध्ये मर या रोगाचा प्रादुरभाव हा जास्त प्रमाणात होतो त्यामुळे बीज प्रकियेमध्ये हायकोडर्मा व्हिरीडी ७५ मीली प्रति बॅग
किंवा पेन्पलूफेन १३.२८% + ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबीन १३.२८%
या दोन्ही पैकी तुम्ही कोणते ही औषद (बुरशीनाशक) घेऊ शकता हे औषद तुम्हाला सोयाबिनच्या बियांनमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि मगच याची पेरणी करायची आहे.
पेरणी कशी करावी :-
सर्वप्रथम तर मित्रांनो तुम्हाला पेरणी चांगला पाऊस पडल्यानंतरच करायची आहे आणि मित्रांनो पेरणी तुम्हाला १५ जुलै च्या आदिच करायची आहे. तर मित्रांनो पेरणी करतानी तुम्हाला बियाचे प्रमाण प्रती एकर ३० किलो इतके घ्यायचे आहे व मित्रानों तुम्हाला जर पट्टा पद्धतीने पेरणी करणार असलाल तर तम्हाला सहा बेड नंतर एक बेड सोडायचा आहे आणि जर मित्रांनो तुम्ही पट्टा पद्धती ने पेरणी केली तर तुम्हाला खूप सारे फायदे होतील.
खत व्यवस्थापन :-
तर मित्रांनो तुम्हाला पहिल्या खत भेसळ डोसामध्ये नत्र प्रति एकर १२ किलो, स्फुरत प्रति एकर ३० किलो, पलाश प्रति एकर १२ किलो आणि सलफर ८ किलो प्रती एकर इतके प्रमाण घ्यायचे आहे आणि मात्रांनों तुम्ही ह्या संर्वांचे भेसळ करून पीकाला देऊ शकता यामुळे तुमच्या पीकाची वाढ चांगल्या प्रकारे होइल.
तन व्यवस्थापन :-
तर मित्रांनो तन व्यवस्थापना मध्ये तुम्हाला पेरणी नंतर २० ते २५ दिवसांनी खुरपनी करायची आहे आणि जर तुम्हाला तन नाशक फवरायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला
वरील फोटो तुसार तनशक घ्याचे आहे आणि त्याची फवारणी तुम्हाला २० ते २५ दिवसांनी घ्यायची आहे आणि मित्रांनो फवारणी तुम्हाला भर उन्हा मध्ये घ्यायची नाही तुम्हाला ही फवारणी दुपारी ५ च्या नंतर घ्यायची आहे आणि मित्रांनो फवारनी करतानी जमीन ही ओली असली पाहिजे.
सोयाबिनच्या पिकाला कोणते रोग व किड येतात? :-
उंटआळी, खोडमाशी, चक्रीभुंगा, पाने खानाऱ्याआळ्या, करपा, शेंगावरील करपा, मुडकुज, तांबेरा



